Sunday, June 8, 2008

हत्तीची खरेदि


डिस्कवरी वाहिनीवर एक माहितीपट बघत असताना विचार आला की हत्ती विकत घ्यावा. हत्तीबद्दल मला नेहमी आकर्षण. आणि त्याचप्रमाणे विद्यादाता श्री गणेशावर श्रद्धा आहे. त्यांचा तो विशाल देह पाहुन एक वेगळाच आनंद मिळतो. पण हत्ती वां कुठलाही दुसरा प्राणी पिंजऱ्यात बघायला आवडत नाही. ते मुक्त, मोकळेच चांगले वाटतात.

डिस्कवरीवर मी जो माहितीपट बघत होतो त्याचे नाव “Wildlife Special - Elephants” . अतिशय चंगला माहितीपट होता. हत्तींकडे काही असाधारण शक्त्या आहेत व ते कुठेतरी मनुष्याशी मिळते-जुळते आहेत. त्यांचा परीवार खूपच मोठा असतो. जर काही संकट आले तर एका समुहातून दुसऱ्या समुहात संदेश पाठवले जातात. आणि हे संदेश बरेच दूर जाऊ शकतात. हत्ती बरेच खादाड असतात. दिवसा त्यांना १५० किलो खाण लागते. आणि पुढच्या महितीवर मी ठरवले हत्ती विकत घ्यायचा. जेवढे खातात तेवढे बाहेर सोडलेच पाहिजे. हत्ती रोज २००० लिटर हवा सोडतात. आणि हा मिथेन वायु असतो. एवढा मिथेन १० तास जळू शकतो. माझ्या आंघोळीसाठी गरम पाणी आणी जेवणासाठी पुरेसा आहे. हल्लीच तेल व गॅसच्या किमती वाढल्या आहेत. गॅस तर ५० रुपये वाढला आहे. त्यामुळे पर्याय शोधावा लागेल. हत्ती एक चांगला पर्याय ठरू शकतात.

म्हणूनच हत्ती वाचवा... पैसा वाचवा.

No comments: